एक तरी बाबा असावा..!


उशीर का होईना,
येताच क्षणी मुलांना शोधणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
शाळेत सोङायला नसणारा,
आजारी झाल्यावर कडेला जागा राहणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
स्वताःची खलगी रिकामी ठेवुन,
नेहमी येताना खाऊ आणणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
स्वताःसाठी न जगणारा,
झेपेल तेवढे दुःख पदरात झेलणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
फाटकी बनियन घालुन,
जिन्सची पॅन्ट घेउन देणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
ङोनेशन साठी उधार आणारा,
वेळ पङली तर हात पाय जोङणारा
असा एक तरी बाबा असावा.
.
.
स्वताःचे दुःख सावरुन
मुलांना आसरा देणारा
असा एक तरी बाबा असावा.
आहे ना असा बाबा तुमच्या प्रत्येका च्या आयुष्यात ?
.

Comments