Posts

Showing posts from September, 2018

शुभेच्छा मान्य

Image
कालच्या दिवसाची सुरवात पारंपरिक पद्धतीने च झाली,आई नी केलेली ओवळणी मात्र कायम लक्षात राहिली.नवीन ट्रेंड च्या नुसार माझ आधी wish,मी ११.५९ लाच फोन केला होता असं आप-आप सात चालुच होते.जिवलग मित्र-मैत्रीण,भाऊ-बहिणी,काही अपेक्षा नि निराशी झाली आणि बरेचशी सवंगडी या सर्वांनी भेटी दिल्यानंतर शेवटी मात्र चाहूल घराकडेच वळली. हा सर्वं दिवसभराचा कालावधी जात असताना अचानक असा मानत प्रश्न दडला कि वाढदिवस का साजरा करायचा ?? एक आठवण म्हणून कि मजा म्हणून कि त्या निमित्ताने सर्वांची भेटीगाठी होत ात म्हणून.आज सगळे नाही पण बहुतेक तर असाच विचार करतात,१० वर्षाचा झालो, १८ वर्ष पूर्ण झाली,५० शी गाठली पण कधी असा विचार केलाच नाही ना.आयुष्यच्या कालावधीत ला एक एक वर्ष कमी कमी होत जातोय ते ? आज येणारा प्रत्येक वाढदिवस आपण सुखा:त आनंदात साजरा करतो.दिवा कधीच विझवत नाही मग केक वर लावलेल्या त्या मेणबत्या का बरं विझवायच्या ? विचारत्मक च गोष्ट आहे जास्त नाही पण थोडा विचार मात्र नक्कीच करूया..! ...... पुरेसा वेळ काढून संगतीने आविसमरण्य क्षण दाखवल्या बद्दल शतश:आभार.  

भूक पाचवी ला पुजलेली असते...?

भूक कशासाठी म्हणे, पोटासाठी ! इथं चांगलं भविष्य मिळेल हा आशावाद उराशी बाळगूण माणुस या पृथ्वी तलावर जन्म घेतो. या पुर्थ्वी तलावर सर्व प्राणीमात्रांची धडपड कशासाठी चालते तर पोटाची भूक भागवण्यासाठी.पहाटे पासुन रात्री झोपे पर्यंत आणि जन्म ल्या पासुन मरे पर्यंत सगळी धावपळ असते ती केवळ भूक भागवण्यासाठी. पोटाची भूक भागली नाही कि गुन्हे,अपराध घडतात पोटाची भूक च माणसाला असे गुन्हे करण्यास भाग पाडते. मंदिर आणि रेल्वे स्थानक समोर पसरले जाणारे हात,त्या मागचा मूळ उद्देश भूक भागवणेच असतो.काही खूप इमानदार असतात पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतंत्र दिवस जवळ येऊ लागला कि झेंडे घेऊन चार चाकीच्या काचा टक-टकून भूकतहान भागवतात.अशी हि माणसाला जनावर बनवणारी भूक आपल्या पूर्वजांनी जाणली होती म्हणून तर आपली संस्कृती सांगते तुझ्याकडे पाच घास असतील,तर त्यातील एक घास तू त्या भुकेलेल्या दे. म्हणुन आज देखील अनेक प्राण अन्ना विना जात आहेत मंदिरा बाहेर गरीबा ला उपाशी ठेऊन मंदिरात नथमस्थक झाल्या नां देव सामर्थ्य देईल का ???