Posts

Showing posts from September, 2019

२६/११

Image
एके दिवशी काय झाले..?? जीवावर उटलेले मारे करी तळाकाठी पोहचले... आणि पथिकाश्रमात राहुन " मुंबई की लेगे जान "वर आराखडे आखले..२६ नोव्हेंबर २००८ रात्री  या दिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. छत्रपती शिवाजी टर्मिनस ,लियोपोल्ड कॅफे, कुलाबा ,ताज महाल हॉटेल,ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल,मादाम कामा इस्पितळ,नरीमन हाउस,ओलिस मेट्रो सिनेमा,माझगांव डॉक आणि विले पार्ले अशा लोकप्रिय स्थळी बॉम्बहल्ले घडवुन अनेक परदेशी नागरिक,मुंबई पोलीस ,भारतीय सुरक्षा दल तसेच अनेक सामान्य जनतेचे बळी घेतले. १०दहशतवाद्यांनी मुंबई मध्ये धुमाकुळ घातला. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले.त्यात पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला.तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले..२६ नोव्हेंबर २००८.आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणुन ओळखले जाते.. . " वेळ आली काळ आला सामोरे गेलो त्या संकटा ना , आज ही शाहरे उटतात त्या ताज हॉटेला पाहताना..त

#माझी मुलाखत

Image
दिवाळी चे दिवस सुरु होते घरात सगळी लगबग सुरु होती. " पोर काय कामाची नाय एक मुलगी झाली असती बर झालं असतं " असं म्हणत pommy बिचारी आपली एकटी कामे पार पाडत होती.रात्री जेवण झाल्यावर तिला म्हंटल सकाळी वेळ आहे का ? तिच्या का ?? म्हणताच मला प्रश्न पडले. मुलाखत हि तिचीच आहे पण विषय माझा आहे. १४ नोव्हेंबर १९९८ चा दिवस भाईंदर,तलावरोड च्या शेजारी च छोटस घर होत आत्या,आजी,मी पपा आणि दादा राहत होतो. आत्या मालकीण बाई असल्या ने सारी कामे माझ्यावरच पडायची. सकाळ नेहेमी प्रमाणे आटपली दुपार आचनक पोटात दुखायला सुरवात झाली.तशीच बाजुवाल्या भाभी ला हाकारत ' साई बाबा हॉस्पिटलमध्ये ' धाव घेतली डॉक्टरांनी तपासायला नकार दिला नाव नोंदवल्या पासून पुढच्या दिवसात एकदाही मी हॉस्पिटल कडे वळली न्हवती, नंतर तितक्यातच मोठी काकी हजर झाली त्या वेळी काकी "विभाग अधिकारी" असल्याने ती च्या दमदाटी नि ०६.०५ मिनिटाला तुझा जन्म झाला . आजी म्हणते तू खूप नशिबवान आहेस माझ्या साठी या मागच कारण मलाही देखील कळल न्हवत पण तिनी सांगितल,त्या सायंकाळी अस काय घडलं ते ज्या ने आज आजी दर पगारा ला न विसरता पैसे द

अ अभिनव चा

Image
१५ जून म्हणजे नेमकं काय तर शाळेचा पहिला दिवस आणि अगोदरचे दोन दिवस म्हणजे सागर रेडिमेंड मधून घेतलेले शालेय गणवेश आणि उज्जव्ल बुक डेपोची पुस्तके अशी काहीशी जून महिन्याची लगबग होती. शाळेचा पहिला दिवस म्हणजे जणु दिवाळीच नवीन बॅग, नवीन कपडे सारं काही नवीन तरी मात्र शाळा आमची जुनीच. जून महिना हा तर केवळ वर्ग बदलण्यातच जायचा, मात्र जुलै महिन्यातील पावसाळ्याचे ते दिवस खूप रमणीय होते. लांबचे शिक्षक येणार नाही त्यामुळे वर्ग एकत्र होऊन जायचे, मग आपला मित्र आपल्या वर्गात येणार त्यासाठी बॅंच अडवून ठेवण्यात वेगळीच मज्जा यायची. गवता मधल्या त्या टाकीत माशे पकडायची गर्दी फारच जमायची. मग सुरु व्हायची पहिली घटक चाचणी असा काहीसा जुलै संपुन आॅगस्ट चालू व्हायचा. आॅगस्ट म्हणजे स्वातंत्र दिनाची तयारी,स्वातंत्र्य दिवस अगोदर पासूनच कार्यक्रमाची रुपरेखा कशी असेल हे सांगून रंगीत तालीम व्हायची. पावसाळी खेळामध्ये सहभागी असल्याने शेवटचे दोन तासिका मधून सुटका मिळायची. सप्टेंबर,आॅक्टोंबर आणि नोव्हेंबर हे मात्र सुट्यामध्ये निघून जायचे. रक्षाबंधन आणि हळदी कुंकू असला की नवीन कपड्यांमध्ये शानमध्ये यायचे. सामही परीक्

तु देशील ना मला साथ ?

Image
प्रेम करीन मी अफाट राग आला तरी मी ताठ तु देशील ना मला साथ..? विसरण्या सारखे क्षण, नाही टिपले आपण आज. सारं ओझ घेऊन डोक्यावर, चीडचीड करशील तु आज. भीती वाटे मला जीवा, मी हरवून जात जाईन. संकटावर मात करण्याचे उपाय तु शोधशील नां ग. तु देशील ना मला साथ..? नाही येणार अश्रु, झटेन मी चोवीस तास. नशिबाच्या प्रसंगावर, करशील ना तु मात. प्रेमाच्या या खेळात जिंकणं आहे माझ स्वप्न तुझी सारी स्वप्न पुर्ण करण हाच आहे माझा ध्यास पण, तु देशील ना मला साथ ?