भूक पाचवी ला पुजलेली असते...?


भूक कशासाठी म्हणे, पोटासाठी ! इथं चांगलं भविष्य मिळेल हा आशावाद उराशी बाळगूण माणुस या पृथ्वी तलावर जन्म घेतो. या पुर्थ्वी तलावर सर्व प्राणीमात्रांची धडपड कशासाठी चालते तर पोटाची भूक भागवण्यासाठी.पहाटे पासुन रात्री झोपे पर्यंत आणि जन्म ल्या पासुन मरे पर्यंत सगळी धावपळ असते ती केवळ भूक भागवण्यासाठी. पोटाची भूक भागली नाही कि गुन्हे,अपराध घडतात पोटाची भूक च माणसाला असे गुन्हे करण्यास भाग पाडते.
मंदिर आणि रेल्वे स्थानक समोर पसरले जाणारे हात,त्या मागचा मूळ उद्देश भूक भागवणेच असतो.काही खूप इमानदार असतात पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतंत्र दिवस जवळ येऊ लागला कि झेंडे घेऊन चार चाकीच्या काचा टक-टकून भूकतहान भागवतात.अशी हि माणसाला जनावर बनवणारी भूक आपल्या पूर्वजांनी जाणली होती म्हणून तर आपली संस्कृती सांगते तुझ्याकडे पाच घास असतील,तर त्यातील एक घास तू त्या भुकेलेल्या दे.
म्हणुन आज देखील अनेक प्राण अन्ना विना जात आहेत मंदिरा बाहेर गरीबा ला उपाशी ठेऊन मंदिरात नथमस्थक झाल्या नां देव सामर्थ्य देईल का ???

Comments