अ अभिनव चा


१५ जून म्हणजे नेमकं काय तर शाळेचा पहिला दिवस आणि अगोदरचे दोन दिवस म्हणजे सागर रेडिमेंड मधून घेतलेले शालेय गणवेश आणि उज्जव्ल बुक डेपोची पुस्तके अशी काहीशी जून महिन्याची लगबग होती. शाळेचा पहिला दिवस म्हणजे जणु दिवाळीच नवीन बॅग, नवीन कपडे सारं काही नवीन तरी मात्र शाळा आमची जुनीच. जून महिना हा तर केवळ वर्ग बदलण्यातच जायचा, मात्र जुलै महिन्यातील पावसाळ्याचे ते दिवस खूप रमणीय होते. लांबचे शिक्षक येणार नाही त्यामुळे वर्ग एकत्र होऊन जायचे, मग आपला मित्र आपल्या वर्गात येणार त्यासाठी बॅंच अडवून ठेवण्यात वेगळीच मज्जा यायची. गवता मधल्या त्या टाकीत माशे पकडायची गर्दी फारच जमायची. मग सुरु व्हायची पहिली घटक चाचणी असा काहीसा जुलै संपुन आॅगस्ट चालू व्हायचा. आॅगस्ट म्हणजे स्वातंत्र दिनाची तयारी,स्वातंत्र्य दिवस अगोदर पासूनच कार्यक्रमाची रुपरेखा कशी असेल हे सांगून रंगीत तालीम व्हायची. पावसाळी खेळामध्ये सहभागी असल्याने शेवटचे दोन तासिका मधून सुटका मिळायची. सप्टेंबर,आॅक्टोंबर आणि नोव्हेंबर हे मात्र सुट्यामध्ये निघून जायचे. रक्षाबंधन आणि हळदी कुंकू असला की नवीन कपड्यांमध्ये शानमध्ये यायचे. सामही परीक्षा संपण्याची वाट आतुरते ने पाहायची कारण दिवाळीची सुट्टी १ महिना असायची. दिवाळीची सुट्टी म्हणजे स्वाधाय पुस्तिका. ती पूर्ण करता करता सुट्टी कधी संपायची कळायचेच नाही.
सुट्टी संपली की ओढ लागायची ती वार्षिक क्रीडा महोत्सवाची, मग पुन्हा डिसेंबर महिन्याचा एक हप्ता सुट्टीत जमा व्हायचा. मग नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता दुसरी घटक चाचणी निपटुन जायची जानेवारी महिना म्हणजे शाळेची सहल आणि अभिनव महोत्सव. सहल म्हंटल तर वाॅटर किंगडम, मी मात्र सलग हॅट्रीक च केली होती. अभिनव महोत्सव म्हणजे मुळात गॅदरींग. गॅदरींगची तयारी मात्र जोशात असायची सरावासाठी एकावर एक बॅंचचे थर रचायला फार धमाल यायची, कुपन देऊन खालेला खाऊ मात्र खूप आठणीत राह्यलाय. फेब्रुवारी व मार्च म्हणजे शाळेचे शेवटचे दिवस १० वी १२ वी परीक्षा असल्याने आम्हाला मात्र रखरखत्या उन्हातून जावं लागयचं. वार्षिक परिक्षेला सुरवात व्हायची मग पेपर संपल्यावर मैदानात बॅट-बाॅल खेळता खेळता एक एक वर्ष कधी पुढे गेल कळलेच नाही. रमणीय असा हा प्रवास कधी ना कधी थांबणार याची कल्पना तर होतीच पण महाविद्यालयात गेल्या वर पुन्हा पावले अभिनवकडे वळतील असे वाटलेच नाही. ( आज तुम्ही पण काही आठवणी रमवल्या असणारच नक्कीच थोडासा वेळ काढून कमेंट मध्ये share करा आणि तुमच्या साथीदाराला टॅग करायला विसरु नका )


#अभिमान_अभिनव_चा #मी_पण_अभिनवकर

Comments