....................अंदर मार भाई....!!!


साऱ्या मुबंईकरांची पहाट धानधळीतच होते. 'अग उशीर होतोय' 'वेळ निघून गेली ग रोजची' मुळात तर वेळ निघतच असते न थांबणारी ती म्हणजे वेळच असते. पायाची दुचाकी बनून सरसटत चालत सुटतो. काही ठराविक नग मध्येच आडवे येतात ' काय ओ हल्ली दिसत नाही डब्याला, नाही ६.१७ लो असतो आता ' अस म्हणत म्हणत स्थानकाच्या पायथ्या पर्यंत तळवे टेकतात. मनाला शांती वाटते कारण ती अजून आलेली नसते ती म्हणजे ट्रेन असते. प्लॅटफॉर्म च्या मुखा पर्यंत जाऊन वाकून ती आली काय बघत असतो ती येताच क्षणी नियमानुसार पाठीवरची बॅग छातीला टेकवतो.
उतरणारे उतरत असतात चढणारे उतरणाऱ्यांना अडथळे निर्माण करत असतात. पायांन वर पाय पडत असतात दोन्ही हात हँडल कडे वळत असतात. ट्रेन सुरु होताच गोंगाट सुरु होतो. नेहमी प्रमाणे दरवाज्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांन कडून " अंदर मार भाई, अरे अंदर मार " हि वाक्य ऐकून प्रवास सुखाचा सुरु होतो. ( मुंबई ची शान म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आज फक्त मुंबईकरांसाठी नाही तर प्रत्येक प्रवाशांन साठी ती तेवढीच गरजेची झाली आहे. प्रत्येकाला कामाच्या वेळे आधी पोहचवण्याच कार्य ती सहज रित्या पार पाडत आली आहे न डगमगता सुखरूप पणे पोहचवण्याच काम नेहमी करत आली आहे )

Comments