शुभेच्छा मान्य

कालच्या दिवसाची सुरवात पारंपरिक पद्धतीने च झाली,आई नी केलेली ओवळणी मात्र कायम लक्षात राहिली.नवीन ट्रेंड च्या नुसार माझ आधी wish,मी ११.५९ लाच फोन केला होता असं आप-आप सात चालुच होते.जिवलग मित्र-मैत्रीण,भाऊ-बहिणी,काही अपेक्षा नि निराशी झाली आणि बरेचशी सवंगडी या सर्वांनी भेटी दिल्यानंतर शेवटी मात्र चाहूल घराकडेच वळली. हा सर्वं दिवसभराचा कालावधी जात असताना अचानक असा मानत प्रश्न दडला कि वाढदिवस का साजरा करायचा ?? एक आठवण म्हणून कि मजा म्हणून कि त्या निमित्ताने सर्वांची भेटीगाठी होतात म्हणून.आज सगळे नाही पण बहुतेक तर असाच विचार करतात,१० वर्षाचा झालो, १८ वर्ष पूर्ण झाली,५० शी गाठली पण कधी असा विचार केलाच नाही ना.आयुष्यच्या कालावधीत ला एक एक वर्ष कमी कमी होत जातोय ते ? आज येणारा प्रत्येक वाढदिवस आपण सुखा:त आनंदात साजरा करतो.दिवा कधीच विझवत नाही मग केक वर लावलेल्या त्या मेणबत्या का बरं विझवायच्या ? विचारत्मक च गोष्ट आहे जास्त नाही पण थोडा विचार मात्र नक्कीच करूया..!
...... पुरेसा वेळ काढून संगतीने आविसमरण्य क्षण दाखवल्या बद्दल शतश:आभार. 

Comments