सकाळ आटपली होती दिवस उजडून अवघे ३ तास ढकले गेले होते.रात्री लवकर झोपत असल्या मुळे सकाळी लवकर डोळे खुलत होते. आचनक, " मी आलो गं आई राउंड मारून " अस म्हणत घराबाहेर पडलो. वातावरण ढगाळ झाल असल तरी उन्हाची झपी लागत होती.वाट रोजची च होती पण मी कुठे जातोय ते सुदडत न्हवत.अचानक एक मनात हाक ऐकायला आली आणि ती त्याचीच हाक होती मी स्तब्ध उभा राहून माझी नजर फक्त त्याच्या कडेच होती.मी मतलबी माणूस त्याचा पुरेपूर वापर करून हली त्याच्याकडे ढुंकून हि नाही पाहिल मला त्याची आठवण येईल म्हणून पाच पाऊल लांबून जायचं मी ठरवले होते.पण आज तोह ओलाचिंब होऊन माझी वाट पाहत होता.मला प्रत्येक अडीअडचणी ला आसरा देण्यात पुढे असायचा.हली माझ्या सोबत बसत नाहीस ?गप्पागोष्टी रंगवत नाहीस ? तुझी मोजकी माणसं पण दिशेणाशी झालीत ? अशी त्याला पडलेले प्रश्न ऐकताच मी निरागस होऊन थोडा वेळ त्याच्या जवळच उभा राहयलो.पुन्हा पावसाच्या सरी सुरु होताच मी त्याच्या कुशीत शिरलो.

Comments

Popular posts from this blog

एक तरी बाबा असावा..!