तु देशील ना मला साथ ?

प्रेम करीन मी अफाट
राग आला तरी मी ताठ
तु देशील ना मला साथ..?
विसरण्या सारखे क्षण,
नाही टिपले आपण आज.
सारं ओझ घेऊन डोक्यावर,
चीडचीड करशील तु आज.
भीती वाटे मला जीवा,
मी हरवून जात जाईन.
संकटावर मात करण्याचे
उपाय तु शोधशील नां ग.
तु देशील ना मला साथ..?
नाही येणार अश्रु,
झटेन मी चोवीस तास.
नशिबाच्या प्रसंगावर,
करशील ना तु मात.
प्रेमाच्या या खेळात जिंकणं आहे माझ स्वप्न
तुझी सारी स्वप्न पुर्ण करण हाच आहे माझा ध्यास
पण,
तु देशील ना मला साथ ?

Comments

Popular posts from this blog

एक तरी बाबा असावा..!