#माझी मुलाखत

दिवाळी चे दिवस सुरु होते घरात सगळी लगबग सुरु होती. " पोर काय कामाची नाय एक मुलगी झाली असती बर झालं असतं " असं म्हणत pommy बिचारी आपली एकटी कामे पार पाडत होती.रात्री जेवण झाल्यावर तिला म्हंटल सकाळी वेळ आहे का ? तिच्या का ?? म्हणताच मला प्रश्न पडले. मुलाखत हि तिचीच आहे पण विषय माझा आहे. १४ नोव्हेंबर १९९८ चा दिवस भाईंदर,तलावरोड च्या शेजारी च छोटस घर होत आत्या,आजी,मी पपा आणि दादा राहत होतो. आत्या मालकीण बाई असल्या ने सारी कामे माझ्यावरच पडायची. सकाळ नेहेमी प्रमाणे आटपली दुपार आचनक पोटात दुखायला सुरवात झाली.तशीच बाजुवाल्या भाभी ला हाकारत ' साई बाबा हॉस्पिटलमध्ये ' धाव घेतली डॉक्टरांनी तपासायला नकार दिला नाव नोंदवल्या पासून पुढच्या दिवसात एकदाही मी हॉस्पिटल कडे वळली न्हवती, नंतर तितक्यातच मोठी काकी हजर झाली त्या वेळी काकी "विभाग अधिकारी" असल्याने ती च्या दमदाटी नि ०६.०५ मिनिटाला तुझा जन्म झाला .
आजी म्हणते तू खूप नशिबवान आहेस माझ्या साठी या मागच कारण मलाही देखील कळल न्हवत पण तिनी सांगितल,त्या सायंकाळी अस काय घडलं ते ज्या ने आज आजी दर पगारा ला न विसरता पैसे देते.मी आपली हातात पानाचा डबा घेऊन दवाखान्याच्या दिशेने जात होती वाटेतच अचनक लक्ष खाली पडलेल्या १०० रुपया च्या नोटी कडे गेल त्या वेळी १००रुपये आजच्या लाखा इतके होते.कंबरेच्या कुशीत खुसपटत दवाखान्यात पोचली. माझा बाबा खूप नशिबवान आहे म्हणत मुका घेऊन खुशीत घेतलं परत घरी जाण्यास निघाली, त्याच वळणावरून चालतांना पुन्हा १०० रुपया ची नोट पायाशी आडवी आली. (मला थोड्या वेळा साठी आजी काय थापा मारते असच काहीस वाटलं पण पपा नि माझी शंका दूर केली) .

Comments