Posts

Image
सकाळ आटपली होती दिवस उजडून अवघे ३ तास ढकले गेले होते.रात्री लवकर झोपत असल्या मुळे सकाळी लवकर डोळे खुलत होते. आचनक, " मी आलो गं आई राउंड मारून " अस म्हणत घराबाहेर पडलो. वातावरण ढगाळ झाल असल तरी उन्हाची झपी लागत होती.वाट रोजची च होती पण मी कुठे जातोय ते सुदडत न्हवत.अचानक एक मनात हाक ऐकायला आली आणि ती त्याचीच हाक होती मी स्तब्ध उभा राहून माझी नजर फक्त त्याच्या कडेच होती.मी मतलबी माणूस त्याचा पुरेपूर वापर करून हली त्याच्याकडे ढुंकून हि नाही पाहिल मला त्याची आठवण येईल म्हणून पाच पाऊल लांबून जायचं मी ठरवले होते.पण आज तोह ओलाचिंब होऊन माझी वाट पाहत होता.मला प्रत्येक अडीअडचणी ला आसरा देण्यात पुढे असायचा.हली माझ्या सोबत बसत नाहीस ?गप्पागोष्टी रंगवत नाहीस ? तुझी मोजकी माणसं पण दिशेणाशी झालीत ? अशी त्याला पडलेले प्रश्न ऐकताच मी निरागस होऊन थोडा वेळ त्याच्या जवळच उभा राहयलो.पुन्हा पावसाच्या सरी सुरु होताच मी त्याच्या कुशीत शिरलो.

शुभेच्छा मान्य

Image
कालच्या दिवसाची सुरवात पारंपरिक पद्धतीने च झाली,आई नी केलेली ओवळणी मात्र कायम लक्षात राहिली.नवीन ट्रेंड च्या नुसार माझ आधी wish,मी ११.५९ लाच फोन केला होता असं आप-आप सात चालुच होते.जिवलग मित्र-मैत्रीण,भाऊ-बहिणी,काही अपेक्षा नि निराशी झाली आणि बरेचशी सवंगडी या सर्वांनी भेटी दिल्यानंतर शेवटी मात्र चाहूल घराकडेच वळली. हा सर्वं दिवसभराचा कालावधी जात असताना अचानक असा मानत प्रश्न दडला कि वाढदिवस का साजरा करायचा ?? एक आठवण म्हणून कि मजा म्हणून कि त्या निमित्ताने सर्वांची भेटीगाठी होत ात म्हणून.आज सगळे नाही पण बहुतेक तर असाच विचार करतात,१० वर्षाचा झालो, १८ वर्ष पूर्ण झाली,५० शी गाठली पण कधी असा विचार केलाच नाही ना.आयुष्यच्या कालावधीत ला एक एक वर्ष कमी कमी होत जातोय ते ? आज येणारा प्रत्येक वाढदिवस आपण सुखा:त आनंदात साजरा करतो.दिवा कधीच विझवत नाही मग केक वर लावलेल्या त्या मेणबत्या का बरं विझवायच्या ? विचारत्मक च गोष्ट आहे जास्त नाही पण थोडा विचार मात्र नक्कीच करूया..! ...... पुरेसा वेळ काढून संगतीने आविसमरण्य क्षण दाखवल्या बद्दल शतश:आभार.  

भूक पाचवी ला पुजलेली असते...?

भूक कशासाठी म्हणे, पोटासाठी ! इथं चांगलं भविष्य मिळेल हा आशावाद उराशी बाळगूण माणुस या पृथ्वी तलावर जन्म घेतो. या पुर्थ्वी तलावर सर्व प्राणीमात्रांची धडपड कशासाठी चालते तर पोटाची भूक भागवण्यासाठी.पहाटे पासुन रात्री झोपे पर्यंत आणि जन्म ल्या पासुन मरे पर्यंत सगळी धावपळ असते ती केवळ भूक भागवण्यासाठी. पोटाची भूक भागली नाही कि गुन्हे,अपराध घडतात पोटाची भूक च माणसाला असे गुन्हे करण्यास भाग पाडते. मंदिर आणि रेल्वे स्थानक समोर पसरले जाणारे हात,त्या मागचा मूळ उद्देश भूक भागवणेच असतो.काही खूप इमानदार असतात पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतंत्र दिवस जवळ येऊ लागला कि झेंडे घेऊन चार चाकीच्या काचा टक-टकून भूकतहान भागवतात.अशी हि माणसाला जनावर बनवणारी भूक आपल्या पूर्वजांनी जाणली होती म्हणून तर आपली संस्कृती सांगते तुझ्याकडे पाच घास असतील,तर त्यातील एक घास तू त्या भुकेलेल्या दे. म्हणुन आज देखील अनेक प्राण अन्ना विना जात आहेत मंदिरा बाहेर गरीबा ला उपाशी ठेऊन मंदिरात नथमस्थक झाल्या नां देव सामर्थ्य देईल का ???

एक तरी बाबा असावा..!

उशीर का होईना, येताच क्षणी मुलांना शोधणारा असा एक तरी बाबा असावा. . . शाळेत सोङायला नसणारा, आजारी झाल्यावर कडेला जागा राहणारा असा एक तरी बाबा असावा. . . स्वताःची खलगी रिकामी ठेवुन, नेहमी येताना खाऊ आणणारा असा एक तरी बाबा असावा. . . स्वताःसाठी न जगणारा, झेपेल तेवढे दुःख पदरात झेलणारा असा एक तरी बाबा असावा. . . फाटकी बनियन घालुन, जिन्सची पॅन्ट घेउन देणारा असा एक तरी बाबा असावा. . . ङोनेशन साठी उधार आणारा, वेळ पङली तर हात पाय जोङणारा असा एक तरी बाबा असावा. . . स्वताःचे दुःख सावरुन मुलांना आसरा देणारा असा एक तरी बाबा असावा. आहे ना असा बाबा तुमच्या प्रत्येका च्या आयुष्यात ? .

....................अंदर मार भाई....!!!

साऱ्या मुबंईकरांची पहाट धानधळीतच होते. 'अग उशीर होतोय' 'वेळ निघून गेली ग रोजची' मुळात तर वेळ निघतच असते न थांबणारी ती म्हणजे वेळच असते. पायाची दुचाकी बनून सरसटत चालत सुटतो. काही ठराविक नग मध्येच आडवे येतात ' काय ओ हल्ली दिसत नाही डब्याला, नाही ६.१७ लो असतो आता ' अस म्हणत म्हणत स्थानकाच्या पायथ्या पर्यंत तळवे टेकतात. मनाला शांती वाटते कारण ती अजून आलेली नसते ती म्हणजे ट्रेन असते. प्लॅटफॉर्म च्या मुखा पर्यंत जाऊन वाकून ती आली काय बघत असतो ती येताच क्षणी नियमानुसार पाठीवरची बॅग छातीला टेकवतो. उतरणारे उतरत असतात चढणारे उतरणाऱ्यांना अडथळे निर्माण करत असतात. पायांन वर पाय पडत असतात दोन्ही हात हँडल कडे वळत असतात. ट्रेन सुरु होताच गोंगाट सुरु होतो. नेहमी प्रमाणे दरवाज्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांन कडून " अंदर मार भाई, अरे अंदर मार " हि वाक्य ऐकून प्रवास सुखाचा सुरु होतो. ( मुंबई ची शान म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आज फक्त मुंबईकरांसाठी नाही तर प्रत्येक प्रवाशांन साठी ती तेवढीच गरजेची झाली आहे. प्रत्येकाला कामाच्या वेळे आधी पोहचवण्याच कार्य ती सहज रित्या पार ...